खान्देशगुन्हेजळगांव

अबुझमाड जंगलात चकमकीत २७ नक्षलवादी ठार, १ कोटी बक्षीस असलेला बसवा राजूचाही झाला खात्मा

अबुझमाड जंगलात चकमकीत २७ नक्षलवादी ठार, १ कोटी बक्षीस असलेला बसवा राजूचाही झाला खात्मा

गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाड जंगलात, दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात बुधवारी (२१ मे २०२५) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये तीव्र चकमक झाली. या कारवाईत २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पोलीस जवान शहीद झाला. ठार झालेल्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रमुख नेते आणि १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य बसवा राजू याचाही समावेश आहे, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली.गुप्त माहितीच्या आधारावर २० मे रोजी रात्रीपासून अबुझमाड परिसरात नक्षलविरोधी मोठी मोहीम राबवण्यात आली. यात दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यांतील ५०० हून अधिक डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि इतर सुरक्षा दलांचे जवान सहभागी होते. बुधवारी सकाळी सर्च ऑपरेशनदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्वरित प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली.काही तास चाललेल्या या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके आणि नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून, त्याच्या बलिदानामुळे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध आणखी कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.बसवा राजूचा खात्मा हा नक्षल चळवळीला मोठा धक्का मानला जात आहे. तो अनेक राज्यांतील हिंसक कारवायांचा सूत्रधार होता आणि त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. या यशस्वी मोहिमेमुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button