स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे कला मंडळाचे प्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव l ५ ऑगस्ट २०२३ l स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्राफेम प्राध्यापक हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात समई प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी हेमंत पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी हेमंत पाटील यांनी कलाविश्व व अभिनयक्षेत्रातील संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक सिद्धता व कला जोपासणूक ही समांतर झाली पाहिजे. कलेची उपासना करताना समर्पित वृत्ती हवी. संघर्षाविना कोणतेही यश मिळत नाही. ज्ञान मिळवा , संघर्ष करा व स्वतःला सिद्ध करा हाच जीवनाचा मूलमंत्र आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा करुणा सपकाळे होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा आर बी ठाकरे, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा स्वाती ब-हाटे ,कला शाखेचे समन्वयक प्रा उमेश पाटील व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा प्रसाद देसाई व कला मंडळाचे अध्यक्ष प्रा योगेश धनगर होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा दिपक चौधरी यांनी केले. प्रास्ताविक कला मंडळाचे अध्यक्ष प्रा योगेश धनगर यांनी मांडले. प्रा संध्या महाजन यांनी प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला.आभारप्रदर्शन प्रा किरण कोळी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा जयंत इंगळे, प्रा निलिमा खडके , प्रा सुर्यकांत बोईनवाड , प्रा किरण कोळी , प्रा विजय भोई, प्रा मयुरी हरिमकर यांनी परिश्रम घेतले.