इतर
माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश; शेकडो समर्थकांसह सामील

माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश; शेकडो समर्थकांसह सामील
मुंबई प्रतिनिधी
पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला रामराम ठोकत आज शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
वाघ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार मंगेश चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी दिलीप वाघ यांचे बंधू आणि पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, वाघ कुटुंबीय व शेकडो कार्यकर्ते देखील भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यात आणखी बळकटी मिळाल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.