इतर

फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये नेता अत्याचार

फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये नेता अत्याचार

जळगाव l प्रतिनिधी सोशल मीडियावरील ओळखीचा गैरवापर करत एका २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावात उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ काढून त्यांना व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत विश्वजित विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बोरजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याने तरुणीवर जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील एका तालुक्यात राहणारी तरुणी उच्च शिक्षण घेत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर तिची सिसोदेशी ओळख झाली. यानंतर त्याने तिला जळगावातील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तिथे त्याने तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढले. पुढे, या फोटोंसह चॅटिंगचे स्क्रीनशॉट तिच्या पालकांना दाखवण्याची धमकी देत त्याने अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केले. या कृत्यादरम्यानचे व्हिडीओही त्याने तयार केले आणि ते तिच्या वडिलांना व नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.शिवाय, सिसोदेने तरुणीच्या वडिलांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीने २६ मे २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार, सिसोदेविरुद्ध बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button