इतर

महागड्या सायकल चोरणारा जेरबंद; दोन सायकल्स जप्त

महागड्या सायकल चोरणारा जेरबंद; दोन सायकल्स जप्त

जळगाव | शहरातील गायत्री नगर परिसरातून महागडी सायकल चोरी करणाऱ्या युवकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून दोन सायकल्स जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई २७ मे रोजी करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मगूर कॉलनी, पिंप्राळा) असे आहे. शिरसोली रस्त्यावरील गायत्री नगर परिसरातून चोरलेली सायकल त्याने चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

पोलिस उपनिरीक्षक राहुल तावडे, चंद्रकांत धनके, पोलीस नाईक विकास सालदिवे, योगेश जारी, पोलीस कॉन्स्टेबल मंदार महाजन व इब्राहीम खाटीक यांच्या पथकाने जयेश राजपूत याला पिंप्राळा परिसरातून ताब्यात घेतले.

तपासात त्याच्याकडून गायत्री नगर येथून चोरी गेलेली सायकल आणि आणखी एक सायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button