इतर
हातात सुरा घेऊन रथ चौकात दहशत माजवणारा युवक अटकेत

हातात सुरा घेऊन रथ चौकात दहशत माजवणारा युवक अटकेत
शनिपेठ पोलिसांची कारवाई; धारदार शस्त्र जप्त
जळगाव (प्रतिनिधी):
शहरातील रथ चौक परिसरात हातात सुरा घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकाला शनिपेठ पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ही घटना दि. ७ जून रोजी सायंकाळी घडली.
कृष्णा सुभाष ठाकूर (वय २८, रा. वाल्मिक नगर, असोदा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो हातात धारदार सुरा घेऊन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत होता. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून धारदार सुरा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी विक्की इंगळे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.