इतर

तीन हजार सहाशे रुपयांची लाच घेणाऱ्या निपाणी येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला अटक जळगाव एसीबीची

तीन हजार सहाशे रुपयांची लाच घेणाऱ्या निपाणी येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला अटक

जळगाव एसीबीची कारवाई

जळगाव | निपाणे (ता. एरंडोल) येथील संत हरिहर माध्यमिक विद्यालयाचे एका शिपायाच्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चाच्या बिलाच्या मंजुरीसाठी ३६०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला . असून मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५) यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार (वय ३३, रा. निपाणे) हे संत हरिहर विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीच्या २३,८१५ रुपयांच्या वैद्यकीय खर्चाच्या बिलाच्या मंजुरीसाठी मुख्याध्यापक महाजन यांनी सिव्हिल हॉस्पिटल व माध्यमिक शिक्षण विभागात प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात ५,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३,६०० रुपयांपर्यंत खाली आणली गेली.

याबाबत तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली होती. प्राथमिक पडताळणीनंतर महाजन यांनी तडजोडीनुसार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी महाजन यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ८५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.यापूर्वीही संदिप महाजन यांनी वेतन निश्चितीच्या फरकाच्या २,५३,७८० रुपयांपैकी ५ टक्के म्हणजेच १२,५०० रुपये लाच मागितल्याचे समोर आले होते. त्या प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडून १०,००० रुपये स्वीकारले होते. त्या गुन्ह्याची नोंद (गु.र.नं. १०५/२०२४) २७ जून २०२४ रोजी कासोदा पोलीस ठाण्यात झाली होती.

या कारवाईचे नेतृत्व पोलिस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर (ला.प्र.वि., जळगाव) यांनी केले. त्यांच्यासोबत सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक (नाशिक परिक्षेत्र) श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सर्वसामान्य नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

📞 दुरध्वनी: 0257-2235477
📱 मोबाईल: 9702433131
📞 टोल फ्री: 1064

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button