डॉ. अलीम वकील यांना “साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार 2025”

डॉ. अलीम वकील यांना “साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार 2025”
डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते सन्मान; साहित्य, शिक्षण व समाजसेवेसाठी योगदानाची दखल
जळगाव (प्रतिनिधी) – इक्रा शिक्षण संस्था संचालित एच. जे. थिम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण, जळगाव येथील माजी प्राचार्य डॉ. अलीम वकील यांना “साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार 2025” ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्र सेवा दल, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार भारताचे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. वकील यांनी आपल्या दीर्घकाळच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यद्वारे समाजात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्र सेवा दलाने त्यांना प्रतिष्ठेचा गौरव बहाल केला.
या विशेष यशाबद्दल इक्रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, संचालक मंडळ, तसेच एच. जे. थिम कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. चाँद खान, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग आणि कर्मचारीवर्ग यांनी डॉ. वकील यांना मन:पूर्वक शुभेच्छा व अभिनंदन दिले.