इतर

विज कोसळून शेतात काम करणाऱ्या तिघांचा मृत्यू

विज कोसळून शेतात काम करणाऱ्या तिघांचा मृत्यू

चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे दि. १५ जून रोजी दुपारी शेतात काम करत असताना अचानक आकाशीय वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये लखन दिलीप पवार (वय १४, रा. कोंगानगर), दशरथ उदल पवार (वय २४, रा. कोंगानगर), आणि समाधान प्रकाश राठोड (वय ९, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. या घटनेत दिलीप उदल पवार (वय ३५, रा. कोंगानगर) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील आणि महसूल मंडळ अधिकारी संदेश निकुंभ हेही उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनामा आणि इतर प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून मृतांच्या वारसांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button