जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट नोंदणीचा पर्दाफाश
४३ जणांनी बनावट सह्या-शिक्क्यांच्या आधारे घेतले बनावट दाखले; नायब तहसीलदारांची पोलिसांत तक्रार
जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट नोंदणीचा पर्दाफाश
४३ जणांनी बनावट सह्या-शिक्क्यांच्या आधारे घेतले बनावट दाखले; नायब तहसीलदारांची पोलिसांत तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, तब्बल ४३ जणांनी तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून खोटे दाखले मिळवल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात नायब तहसीलदार नवीनचंद अशोक भावसार यांनी शहर पोलीस ठाण्यात ४३ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
५० पैकी ४३ अर्ज बनावट
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने अलीकडेच ५० दाखले जारी केले होते. मात्र, त्यातील फक्त ७ अर्जच वैध असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. उर्वरित ४३ अर्ज पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
११ अर्ज नोंदवहीतच नाहीत
विशेष म्हणजे, या बनावट अर्जांपैकी ११ अर्जांचा उल्लेख तहसील कार्यालयाच्या नोंदवहीतच नाही. म्हणजेच, हे अर्ज अधिकृतरीत्या सादरच करण्यात आले नव्हते, तरीसुद्धा त्यावर बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे दाखले तयार करण्यात आले.
जळगावसह अन्य शहरांतील नागरिकांचा सहभाग
जळगाव शहरातील चांद महंमद प्यारजी बागवान, असलम खान सादिक खान, अशफाक बुढान बागवान, बुशरा खान मोहम्मद इस्लाउद, मोहसिन चांद मोहम्मद, निगार सुलताना हाफिज खान, समीर खान अयुब खान, नसरीन बानो आयुब खान, अफजल खान आयुब खान, नदीम खान हाफिज खान, शिरीष बानो फरीक शहा, आरिफ खान इसा खान, शहाआरिफ अहमद, समशेर बेग तुराब बेग, तोसिफ शहा जिनाउल्ला शहा, तुराब बेग गुलाब बेग, शहनाजबी शेख मुनीर, वाहेदाबी अब्दुल गणी, शोहरत अली शरीफ मुनसारी, शेख शांनदोस शेख इसाक यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, नशिराबाद येथील कनिज रज्जाबी अब्दुल गणी, मुंबई येथील अब्दुल्ला अजगर अली सय्यद, यावल येथील खान असदुल्ला खान हाफिज आणि जळगाव शहरातील नुसरत बानो, जबी उल्ला शहा, शहा अयाज अहमद अब्दुल अजीज, मोहम्मद वसीम जबी मुल्ला शहा, मोहम्मद जफर जबी उल्ला शहा, जनीक परविन अमानुउल्ला शहा, बिस्मिल्लाह खान, शेख सलीम शेख बशीर, शेख अनिल शेख बशीर, मोहम्मद अखिल शेख बशीर, मोहम्मद कलीम शेख बशीर, शरीफ नईमोद्दीन, मोहम्मद शकील शेख बशीर, अमरीन रशीद पटेल, जाकीर फकीर मोहम्मद तांबोळी, तबसून परविन मोहम्मद इकबाल, शेख मोहम्मद इकबाल अब्दुल रहीम, राहत नाच जबी उल्ला शहा, अंजूमबी शेख फरीद, तसलीमा बी शेख यासिम यांचा समावेश आहे.