खान्देशगुन्हेजळगांव

पाचोरा शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत युवक- युवतीची आत्महत्या

पाचोरा;-शहरातील मानसिंगका काॅलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
शहरातील मानसिंगका काॅलनी येथील रहिवाशी ललित राजाराम पाटील (वय – २१) या तरुणाचा ६ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पंचायत समितीच्या पडक्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल संतोष राजपुत, गुणवंत पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व अमोल पाटील यांच्या मदतीने ललित पाटील यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. मयत ललित पाटील हा शहरातील वेल्डिंग दुकानावर काम करीत होता. ललित पाटील याचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल अमोल पाटील हे करीत आहे.
दरम्यान शहरातील पुनगाव रोडवरील पुरुषोत्तम नगर भागातील रहिवासी राजश्री विरेंद्र पाटील (वय – २१) या तरुणीने घरात कोणी नसतांना राहत्या घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल संतोष राजपुत, गुणवंत पाटील हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने राजश्री पाटील हिस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी राजश्री पाटील हिस मृत घोषित केले. मयत राजश्री पाटील ही जळगांव येथे शिक्षण घेत होती. राजश्री पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले असुन आई पाचोरा तालुक्यातील पुनगाव ग्राम पंचायतीत कर्मचारी म्हणून कार्यरत असुन राजश्री हिची आई चाळीसगाव येथे गेल्या होत्या. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. राजश्री हिने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप समजु शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button