खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव जिल्ह्यातून ५ विवाहिता , तरुणी झाल्या गायब !

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध ठिकाणांहुन ५ तरुणी बेपत्ता झाल्या असून त्या च्या पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पारोळा तालुक्यातील टिटवी येथून १९ वर्षीय तरुणी १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुणालाही न सांगता निघून गेली. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातुन १८ वर्षीय तरुणी कुणालाही न सांगता निघून गेली . याबाबत मुक्ताईनगर पोलिसांत हरविल्याची नोंद तिच्या पालकांनी तक्रार केल्यावरून करण्यात आली आहे. तिसर्या घटनेत जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातून ३२ वर्षीय विवाहिता ९ रोजी फोनवरून मी घर सोडून जाते असे रागात सांगून निघून गेली . विवाहितेच्या पटीने तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्यावरून हरविल्याची नोंद करण्यात अली आहे. चौथ्या घटनेत २२ वर्षीय विवाहिता रामजी पाडा येथून कुणालाही न सांगता निघून गेल्याची घटना ९ रोजी दुपारी २ वाजता घडली असून याप्रकरणी विवाहितेच्या पतीने दिलेल्या खबरीवरून अडावद पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच ५ व्या घटनेत रावेर शहरातून २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली असून तिच्या पतीने रावेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button