
संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाज उभारण्यासाठी ‘मूव्हमेंट फॉर पीस अॅण्ड जस्टिस’ची कार्यशाळा संपन्न
जळगाव प्रतिनिधी“प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा आणि न्याय मिळवण्याचा हक्क मिळालाच पाहिजे, हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ आहे,” असे प्रतिपादन मूव्हमेंट फॉर पीस अॅण्ड जस्टिस (एम.पी.जे.) महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष जनाब मुहम्मद सिराज यांनी केले.
‘एम.पी.जे. फॉर वेलफेअर, जिल्हा जलगाव’तर्फे एक दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन जलगाव येथील इक़रा एच.जे. थिम कॉलेजच्या मोतीवाला हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश संघटनेच्या कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे — न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता — यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य महासचिव जनाब अफसर उस्मानी यांच्या स्वागतपर भाषणाने झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आमचे काम संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच चालते, कारण हेच दस्तावेज प्रत्येक भारतीयाला सन्मानाने आणि शांततेत जगण्याचा अधिकार देतो.”
यानंतर राज्य उपाध्यक्ष जनाब तंजीम अन्सारी यांनी संघटनेचे उद्दिष्ट, ध्येय आणि मूल्ये स्पष्ट करताना म्हटले की, “ही केवळ एक संघटना नाही, तर जनजागृतीची चळवळ आहे जी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत समानता आणि न्यायाचा संदेश पोहोचवत आहे.”
राज्य सचिव जनाब महेमूद खान यांनी संविधानातील ‘गरिमा आणि न्याय’ या मूलतत्वांवर भाष्य करताना सांगितले की, “जोपर्यंत प्रत्येक माणसाची इज्जत सुरक्षित नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होऊ शकत नाही. प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि न्याय हा त्याचा मूलभूत हक्क आहे.”
तसेच जिल्हाध्यक्ष जनाब मुस्तकीम खान यांनी “हक्क मिळवण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर” भाष्य करताना म्हटले की, “आजही शिक्षण, आरोग्य आणि न्यायापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. हे दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.” त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक ‘महाड सत्याग्रहाचा’ उल्लेख करत सांगितले की, “बाबासाहेबांनी जेव्हा चवदार तळ्यातून पाणी पिले, ते केवळ पाणी नव्हते, तर तो सन्मान आणि हक्काचा प्रतीकात्मक घोट होता.”
राज्याध्यक्ष जनाब मुहम्मद सिराज यांनी पुढे बोलताना “दान नव्हे, हक्क” या दृष्टिकोनावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “जेव्हा नागरिक आपले हक्क ओळखतील, तेव्हाच खरी बदलाची प्रक्रिया सुरू होईल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष जनाब मोईन शेख आणि तालुका उपाध्यक्ष जनाब शेख नईम यांनी केले. कार्यशाळेच्या शेवटी राज्याध्यक्ष सिराज साहेबांनी महाले सर यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. महाले सर यांनी जबाबदारी स्वीकारताना आयोजकांचे आभार मानले आणि जिल्हा युनिट अध्यक्ष जनाब आदिल खान, महेमूद खान, मुस्तकीम खान, शेख नईम, अनवर शेख, नियामत खान, इमरान खान, अर्मगान भाई तसेच अहमद सेठ, रहीमुद्दीन भाई, जाकीर भाई, मोईन सर, ताहेर खाटीक, नाजिम कादरी आदींना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली असून तिने समाजात संविधानिक जागरूकता, शांतता, न्याय आणि बंधुतेचा नवा संदेश दिला आहे.





