गडचिरोलीकडे “स्टील हब”च्या दिशेने ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोयड्स मेटल्सचे विविध प्रकल्प उद्घाटन

गडचिरोलीकडे “स्टील हब”च्या दिशेने ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोयड्स मेटल्सचे विविध प्रकल्प उद्घाटन
गडचिरोली प्रतिनिधी I गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असून, तो “भारताचा स्टील हब” होण्यासाठी सज्ज होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये:
✅ कोन्सारी येथे १०० खाटांचे रुग्णालय
✅ कोन्सारी येथे आधुनिक सीबीएसई शाळा
✅ सोमनपल्ली येथे लोयड्स टाउनशिप
✅ हेड्री ते कोन्सारी स्लरी पाइपलाइन
✅ हेड्री येथील आयर्न ओर ग्राइंडिंग युनिट
✅ लोयड्स मेटल्स अँड एनर्जीचा अँथेम लॉन्च
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, विधान परिषदेचे सदस्य परिनय फुके, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार धर्मराव बाबा अत्राम, पद्मश्री सन्मानित सौ. तुलसी मुंडा, लोयड्स मेटल्स अँड एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीच्या दृष्टीने हे प्रकल्प आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहेत. रोजगार निर्मिती, स्थानिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक प्रगतीसाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





