झेडपीत ८ विभागांतील १०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

झेडपीत ८ विभागांतील १०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
१३३६ बदल्यांची प्रक्रिया सुरू
जळगाव : जिल्हा परिषदेत विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला असून मंगळवारी ८ विभागांतील १०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये प्रशासकीय स्वरूपाच्या १३३६ बदल्यांचा समावेश आहे. सर्व बदल्या समुपदेशन पद्धतीने पार पडल्या असून प्रक्रिया पारदर्शकतेने राबवण्यात आली.
या बदल्यांमध्ये प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, लेखाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), आरोग्य पर्यवेक्षक, परिचर, पर्यवेक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी आदी १८ संवर्गांचा समावेश होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षेत्रा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बाबूल फाटील यांच्यासह विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायत विभागात ५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये ९ प्रशासकीय व ४९ विनंती बदल्यांचा समावेश आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात १ प्रशासकीय आणि १ विनंती बदली, आर्थिक विभागात ९ प्रशासकीय आणि २ विनंती बदल्या, पशुसंवर्धन विभागात ४ विनंती बदल्या तर शिक्षण विभागात १९ प्रशासकीय व ३ विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.