इतर

मनोज चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश: जळगावच्या राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत

मनोज चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश: जळगावच्या राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महापालिकेत दोन वेळा नगरसेवक राहिलेले मनोज दयाराम चौधरी यांनी दहा वर्षांच्या खंडानंतर राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे. आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

मनोज चौधरी यांची ओळख स्वच्छ प्रतिमेचे आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे नेते अशी आहे. दोन पंचवार्षिक कार्यकाळात नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपला ठसा उमटवला. एकदा विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर ते राजकारणापासून काहीसे दूर झाले होते. मात्र, आता दहा वर्षांनी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात उडी घेतली आहे. सध्या ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

ब्राह्मण संघ सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. यामध्ये आमदार राजू मामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांसारख्या नेत्यांचा समावेश होता.

चौधरी यांचा भाजपप्रवेश हा जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयात त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button