
सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याऱ्या नराधमाला शरिया कायद्यानुसार मृत्युदंड द्या
जळगाव प्रतिनिधी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून महिला व अल्पवयीन मुलींवर बलात्कार, अत्याचार व विनय भंगाच्या घटनांनत वाढ झालेली असून हे आपल्या संबंध महाराष्ट्रा साठी अत्यंत लाजिरवाणी बाब असून अशे कृत्य करणाऱ्या नराधमांची दिवसेंदिवस हिम्मत वाढलेली असून आपल्या आया बहिणी आता सुरक्षित राहिलेल्या नसून त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.
म्हणून बलात्कार प्रकरणांत जर का सरकारने इस्लामी शरिया कायद्याप्रमाणे नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा दिली तर नक्कीच या नराधमांत धडकी भरून येऊन ते असले अमानवीय कृत्य करण्यास धजावणार नाही. असा कडक कायदा करण्यात यावा तसेच शाळा, महाविद्यालय व सर्वत्र ज्या ठिकाणी मुली व महिला असतात त्या ठिकाणी काम करण्याऱ्यांना पोलीस चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करावे, शाळा, महाविद्यालयाच्या बस मध्ये महिला वाहक ही ठेवावे, प्रत्येक वाहनात जी. पी. एस. प्रणाली लावावे, तसेच चोपडा तालुक्यात एका बस वाहकाने एका पाच वर्षीय विध्द्यार्थ्यांचे मासिक पास संपल्यामुळे बस भररस्त्यात थांबवून, भर पावसात, निर्मनुष्य ठिकाणी एकट्या ला उतरवून दिले. त्या ठिकाणाहून त्या विधार्थ्याचे घर पाच किलोमीटर होते. जर समजा त्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण असते ? म्हणून त्या संबंधित वाहकावर योग्य कारवाई होऊन यापुढे कोणीही अशा प्रकारे चुकीचे काम करू नये असे परिवहन विभागाला आपल्या कडून आदेश देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे महामहिम मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. जिलाधिकारी सो. जळगांव यांच्या द्वारे पाठविण्यात आले. या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकुर बादशाह, शेख जमील, आसीफ शाह, अमान बिलाल, शेख शफी, सय्यद इरफान,कामिल खान, शेख अरसलान इ. उपस्थीत होते





