राजकीयजळगांव

लोकसभा निवडणूक : अमळनेर शहरात घुमला ‘मशाल’चा नारा

फुलांचा वर्षाव करत रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत

खान्देश टाइम्स न्यूज l ०६ मे २०२४ l अमळनेर l महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ अमळनेर शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला अमळनेरकरांनी जोरदार प्रतिसाद देत फुलांचा वर्षाव करीत जोरदार स्वागत केले. करणदादा तुम आगे बढो, हम तूम्हारे साथ है, तुमची आमची निशाणी काय… मशाल… मशाल, मोदी हटाव, शेतकरी बचाव यासारख्या घोषणांनी अमळनेर शहर दणाणले होते.

गांधलीपुरा चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्य बाजारपेठ रोड, राजे संभाजी चौक, सराफ बाजार, पान खिडकी, जुनी चावडी, वाडी चौक, कसाली मोहल्ला, राजा चौक, भोई वाडा, कोळी वाडा, श्री संताजी महाराज चौक, बहादरपुर रोड, माळीवाडा, सावता वाडी, झामी चौक, बालाजी पुरा, पवन चौक, कुंटे रोड, महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट, लालबाग शॉपिंग सेंटर, छत्रपती शिवाजी रोड, भागवत रोड, बस स्थानक, धुळे रोडमार्गे प्रचार कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी शेतमालाला हमीभाव, महागाई यासारख्या विषयांवर संवाद साधला.

रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेनेच्या नेत्या ॲड. ललिता पाटील, तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज दाजीबा, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, रोहिदास पाटील, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, रवींद्र पाटील, गजेंद्र साळुंखे, नितीन निळे, श्रीकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत पाटील, प्रताप नागराज पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, कौस्तुभ पाटील, मगन पाटील, प्रताप पाटील, तुषार संदानशिव, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, शहराध्यक्ष नंदू पाटील, जिल्हा संयोजक प्रा. गणेश पवार, शहर सचिव डॉ. महेंद्र साळुंखे, शहर संघटक रामकृष्ण देवरे, तालुका उपाध्यक्ष नारायण पाटील, राजेंद्र पाटील, लियाकत, रवींद्र पाटील, प्रतिभा पाटील, दिनेश पाटील, डॉ. रुपेश संचेती, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भाट, जिल्हा सरचिटणीस इमरान शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फुलांच्या वर्षावात स्वागत : 
करणदादा पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून तर ठिकठिकाणी रॅलीवर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. रॅलीदरम्यान, करण दादापाटील यांनी श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री मांगीर बाबा, सिद्धी विनायकाचे दर्शन घेवून साकडे घातले. रॅलीच्या समारोपानंतर करणदादा पाटील यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कल्याण बापू पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट देवून विविध विषयांवर चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button