जळगाव ;- भारताने 14 वर्षानंतर एशियन गेम मध्ये हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तसेच प्रथमता शंभर पदकाच्या वर कमाई केल्याने शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव तर्फे जल्लोष करण्यात आला व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.
खेळाडूंनी तिरंगा घेऊन स्टेडियमला संपूर्ण राऊंड मारले तर लहान खेळाडूंनी सुद्धा तिरंगा घेऊन चक दे इंडिया म्हणत सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन व स्वागत केले.
हॉकी जळगाव चे सचिव फारूक शेख, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अनिता कोल्हे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रदीप तळवलकर व किशोर चौधरी तसेच ध्यानचंद अकॅडमीचे सत्यनारायण पवार, हॉकीची राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा शिक्षिका वर्षा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष सोहळा पार पडला.
खेळाडूंची होती खास उपस्थिती
सरला अस्वार, गायत्री अस्वार ,रूपाली अस्वार, आरती ढगे, निकिता पवार, विद्या खरोटे, रोहिणी सुतार, खुषी श्रीवास्तव, उमा जाधव, उर्मिला पाटील.आदी खेळाडू उपस्थित होते.