खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

भुसावळ पोलिसांच्या धडक कारवाईत १६ मोटारसायकली चोरीचा पर्दाफाश; ८.३२ लाखांचा माल जप्त

भुसावळ पोलिसांच्या धडक कारवाईत १६ मोटारसायकली चोरीचा पर्दाफाश; ८.३२ लाखांचा माल जप्त

भुसावळ : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून झालेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. तब्बल १६ दुचाकी चोरी उघडकीस आणत, ८ लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

फिर्यादी अजहरुद्दीन नियाजुद्दीन शेख यांच्या हिरो कंपनी HF डिलक्स मोटारसायकली चोरी झाली होती. २२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला (२०, रा. गारग्या, ता. झिरण्या, जि. खरगोण, म.प्र.) यास शाहपुर (जि. बऱ्हाणपूर) येथून ताब्यात घेतले.

चौकशीत विक्रमने सांगितले की, त्याने साथीदार राहुल रितेश चव्हाण (१८, रा. जयभिम मोहल्ला, शाहपुर, जि. बऱ्हाणपूर) यांच्या मदतीने ही चोरी केली. दोघांनी एकूण १६ मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी पंचनाम्याद्वारे सर्व दुचाकी जप्त केल्या.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने हवालदार विजय नेरकर, पोलीस नाईक सोपान पाटील, कर्मचारी योगेश माळी, भुषण चौधरी, प्रशांत सोनार, महेंद्रसिंग पाटील, अमर अढाळे, किरण धनगर, रवींद्र भावसार, सचीन चौधरी, जावेद शहा, हर्षल महाजन, योगेश महाजन यांच्या सहभागाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button