
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी पूर्ण; पोलिस प्रशासनाचे आभार
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापुरा, पंचशील नगर येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना निवेदन दिले होते. या मागणीला प्रतिसाद देत पोलिस प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, सामाजिक कार्यकर्ते आसिफ शाह बापू यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

तांबापुरा, पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा स्थानिकांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक महत्वाचा स्थळ आहे. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती. सामाजिक कार्यकर्ते आसिफ शाह बापू (बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष) यांनी या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. याशिवाय, गौतम भाऊ सुरवाडे (तांबापुरा, फुकटपुरा, पंचशील नगर पुतळ्याचे अध्यक्ष) आणि जमील भाई शेख (सामाजिक कार्यकर्ते) यांनीही या प्रयत्नांना साथ दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपाधीक्षक अशोक नखाते आणि शहर डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी जळगाव पोलीस स्टेशनने या मागणीची पूर्तता केली. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे प्रमोद पाटील यांचे विशेष योगदान असल्याचे आसिफ शाह बापू यांनी नमूद केले. दोन दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, यामुळे पुतळा परिसरातील सुरक्षितता वाढेल आणि गुन्ह्यांना आळा बसेल.
सामाजिक कार्यकर्ते आसिफ शाह बापू यांनी सांगितले, “जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब, उपाधीक्षक अशोक नखाते , डीवायएसपी संदीप गावित आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे प्रमोद पाटील यांचे मी विशेष आभार मानतो. ही मागणी पूर्ण झाल्याने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची सुरक्षा व्हावी, ही आमची मुख्य उद्दिष्टे पूर्ण झाली आहे. याचा आनंद होत आहे.”





