
जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे प्रवासात वाढणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने जळगावकरांसाठी मोठा दिलासा दिला आहे. पुणे-जळगाव-भुसावळ मार्गावर सहा नवीन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे उत्सवी काळात प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
🚆 गाडी क्रमांक 01431 – पुणे ते गाजीपूर सिटी
धावणार कालावधी : 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर
दिवस : प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार
सुटण्याची वेळ : पुणे येथून सकाळी 6.40 वाजता
जळगाव आगमन : दुपारी 3.23 वाजता
🚆 गाडी क्रमांक 01432 – गाजीपूर सिटी ते पुणे
धावणार कालावधी : 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर
दिवस : प्रत्येक बुधवार आणि शनिवार
सुटण्याची वेळ : गाजीपूर सिटीवरून रात्री 10.40 वाजता
भुसावळ आगमन : तिसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता
जळगाव आगमन : सकाळी 6.50 वाजता
पुणे आगमन : दुपारी 4.20 वाजता
🚆 गाडी क्रमांक 01481 – पुणे ते दाणापूर
धावणार कालावधी : 26 सप्टेंबर ते 1 डिसेंबर
दिवस : प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार
सुटण्याची वेळ : पुणे येथून रात्री 7.55 वाजता
जळगाव आगमन : दुसऱ्या दिवशी सकाळी 5.28 वाजता
🚆 गाडी क्रमांक 01482 – दाणापूर ते पुणे
धावणार कालावधी : 28 सप्टेंबर ते 3 डिसेंबर
दिवस : प्रत्येक बुधवार आणि रविवार
सुटण्याची वेळ : दाणापूर येथून दुपारी 12.30 वाजता
जळगाव आगमन : दुसऱ्या दिवशी दुपारी 3.45 वाजता
पुणे आगमन : रात्री 11.55 वाजता
🚆 गाडी क्रमांक 01201 – नागपूर ते हडपसर
धावणार कालावधी : 29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर
दिवस : प्रत्येक सोमवार आणि गुरुवार
सुटण्याची वेळ : नागपूर येथून रात्री 7.40 वाजता
जळगाव आगमन : पहाटे 2.45 वाजता
या विशेष गाड्यांमुळे जळगाव, भुसावळ परिसरातील प्रवाशांना उत्सवी काळात प्रवास अधिक सोपा आणि सुलभ होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या गाड्यांमध्ये प्रवाशांना आसन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असून गर्दीचा मोठ्या प्रमाणावर ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





