
शिवसेना उपनेत्या शितल देवरूखकर-शेठ व शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे जळगावात
जळगाव- प्रतिनिधी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या शितल देवरूखकर-शेठ, शिवसेना राज्य संघटक तथा शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के आज एक दिवसीय जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सकाळी 10 वाजता जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड, जळगाव येथे युवासेना आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहणार आहेत.
या नंतर जळगाव शहरातील विविध महाविद्यालयात युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन करणार आहेत व युवासेना आयोजित युवा संवाद या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी 4.30 वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वर यांची भेट घेत विविध विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा करणार आहेत.
या दौऱ्याचे नियोजन युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी व युवासेना कॉलज कक्ष चे प्रितम शिंदे हे पाहत आहे.





