
दिवाळीनिमित्त गोरगरीब कुटुंबियांना फराळ , मिठाई आणि साड्यांचे वाटप
दिवाळी सुफी नाईट कार्यकमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी
दिवाळी आणि खान्देश टाइम्सचे जकी अहमद यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब कुटुंबीय आणि लहान मुलांना फराळ,मिठाई व साड्यांचे वाटप आणि “दिवाळी सूफी नाईट” हा कार्यक्रम २० ऑक्टोबर २०२५ रोजी पद्मालय पोलिस हॉल जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

जळगाव शहरातील विविध भागांमध्ये राहणारे गरीब कुटुंबीय आणि त्यांची मुले यांची दिवाळी आनंदात जावी यानिमित्ताने खान्देश टाईम्स न्यूज, महापोलीस न्यूज आणि जळगाव मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते फराळ,मिठाई आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांसह महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
तसेच सायंकाळी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध गायक शफीक मस्तान आणि त्यांची टीम यांनी “दिवाली सूफी नाइट” या कार्यक्रमात आपली सुरेल सूफी गायकी सादर करून संध्याकाळ रसिक प्रेक्षकांसाठी संस्मरणीय बनवली. कार्यक्रमात नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक जकी अहमद, चेतन वाणी, वसीम खान, राकेश वाणी, सुनील भोळे, आदिल खान, अयाज मोहसीन आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.





