
जळगाव शहरातील हरिजन छात्रवासात पु.ल.देशपांडे लिखित साहित्य वाटप
जळगाव – दिग्विजय स्पोर्ट्स एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटीतर्फे आज विद्यार्थी दिवस तसेच महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हरिजन छात्रवासातील प्रवेशित विद्यार्थिनींना पु. ल. देशपांडे यांचे लिखित साहित्य व प्रतिमा भेट देण्यात आली.
या कार्यक्रमास माजी महापौर सौ. सीमा सुरेश भोळे, सौ. सुरेखा नितीन तायडे, सौ. गायत्री इंद्रजीत राणे, डॉ. विवेक जोशी, दिग्विजय फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बागरे, वसंत गवळी, शिवाजी पवार, आदित्य बागरे, प्रसाद पुंडे, तेजस खरारे, विनीत तेजकर व अभिनव बागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रशिक्षक प्रवीण पाटील यांनी केले तसेच सुरेश आदिवाल यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षकवृंद व मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींमध्ये वाचन संस्कृती जोपासण्याचा आणि पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्व व कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.





