पारोळा : शहरातील नगरपालिकेचा घनकचरा खत निर्मिती प्रकल्पाच्या डेपोतून चार मोटारी लांबवल्याची घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नगरपालिका हद्दीत असलेला घनकचरा डेपो खत निर्मिती प्रकल्प आहे. यामध्ये विविध मशिनरींवर मोटारी बसवण्यात आलेल्या होत्या. या मोटारी दि. २८ रोजी सुव्यवस्थित पद्धतीने होत्या मध्यरात्रीच्या सुमारास चारही मोटारी लांबवून नेल्या. या प्रकरणी सिद्धार्थ इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्य्क फौजदार इकबाल शेख करीत आहे.