खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव पोलीस मुख्यालयात मोठी कारवाई; कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने दोन अंमलदार निलंबित

जळगाव पोलीस मुख्यालयात मोठी कारवाई; कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने दोन अंमलदार निलंबित

पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशाने पोलीस दलात खळबळ

जळगाव : पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी हे आदेश निर्गमित केले असून या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री ९:२० वाजता राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांनी पोलीस अधीक्षक बंगल्याच्या गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान गार्ड ड्युटीवर तैनात असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदिप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्यस्थळी अनुपस्थित असल्याचे आढळून आले.

तपासणीदरम्यान आणखी गंभीर बाब समोर आली असून गार्ड रूममध्ये ठेवलेली ३ एस.एल.आर. रायफल (बट नं. ८२.२६२.८८२) ही विना दारूगोळा आणि सुरक्षिततेची योग्य काळजी न घेता बेवारस अवस्थेत ठेवण्यात आली होती. संवेदनशील कर्तव्यावर असताना अशा प्रकारची निष्काळजीपणा गंभीर स्वरूपाचा मानला जात असून तो महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ च्या नियम ३ चे उल्लंघन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या गंभीर वर्तनाची दखल घेत पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दोन्ही अंमलदारांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय जळगाव येथेच राहणार असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button