खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

वाढदिवसाला उत्सवाऐवजी जनसेवेची जोड

वाढदिवसाला उत्सवाऐवजी जनसेवेची जोड

आरोग्यसेवेतून गरजू रुग्णांना मदतीचा हात; पै. शिवाजी पाटील यांचा सेवाभावी उपक्रम

जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न ठेवता तो समाजातील गरजू नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा उपक्रम पै. शिवाजी पाटील यांनी सुरू ठेवला आहे. आरोग्यविषयक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तसेच आमदार अमोल दादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना आणि वैद्यकीय सेवांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी पै. शिवाजी पाटील पुढाकार घेत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच उपचारासाठी आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

“माझा वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजातील गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्याचा दिवस आहे. आरोग्यसेवेपासून कोणताही गरजू नागरिक वंचित राहू नये, हीच माझी इच्छा आहे,” अशी भावना पै. शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली.

वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवेला प्राधान्य देण्याचा हा उपक्रम समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे. ‘सेवा हीच समाजाची खरी शक्ती’ या भावनेतून पै. शिवाजी पाटील यांचे कार्य सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button