खान्देशगुन्हेजळगांव

धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १४ जणांवर तीन दिवस हद्दपारीची कारवाई

धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १४ जणांवर तीन दिवस हद्दपारीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील १४ जणांना धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी आदेश दिले आहेत .

धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर १४ जणांना शहराबाहेर पाठविण्यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्याकडून अहवाल सादर करण्यात आला होता. प्रस्तावाला गोसावी यांनी मंजुरी दिली. दि.१२ ते १५ मार्च सकाळी ८ वाजेपर्यत १४ जणांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. होळी व धुलिवंदनाच्या कालावधीत या १४ जणांना शहराबाहेर जावे लागणार आहे. शहरात हद्दपारीच्या कालावधीत आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यांच्यावर झाली हद्दपारीची कारवाई
राकेश मिलिंद जाधव (रा.मढी चौक, प्रिंपाळा), किरण अशोक सपकाळे (हुडको, पिंप्राळा), सचिन अभयसिंग चव्हाण (गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा), जय राजेंद्र सैंदाणे (समतानगर), दानिश बाशीत पिंजारी (खंडेरावनगर), झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधीनगर), समीर सलीम शेख (आझादनगर), राम उर्फ बारकू संतोष भोई (खंडेरावनगर), लखन संतोष भोई (खंडेरावनगर), सागर कपील भोई (खंडेरावनगर), दत्तू विश्वनाथ कोळी (म्युन्सिपल कॉलनी), अक्षय उर्फ गंम्प्या नारायण राठोड (पिंप्राळा), नितेश मिलिंद जाधव (मढी चौक), इच्छाराम पुंडलिक वाघोदे (समतानगर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button