
जळगाव प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त दुसऱ्या दिवशी ह.भ.प अमृत महाराज गाढे बेटावदकर यांनी परमात्मा एक आहे कारण तो सुरुवात, मध्य आणि अंत या सर्व काळांमध्ये अस्तित्वात आहे. या विचारांनुसार, आत्मा हा परमात्म्याचाच एक भाग आहे आणि खरी प्रगती ही आत्मिक उन्नतीमध्ये आहे.
जगातील सर्व गोष्टी या क्षणभंगुर असल्या तरी, परमात्मा हाच या सर्वांचा आधार आणि सत्य आहे. असे सांगत अध्यात्मिक किर्तन केले. कीर्तनाला साथ संगतीसाठी ह भ प अविनाश महाराज जामनेरकर गायनाचार्य, ह भ प कैलास महाराज, ह भ प ज्ञानेश्वर महाराज राजूरकर, ह भ प विशाल महाराज चिलगावकर यांची सहकार्य लाभले. उद्या बुधवार रोजी ह भ प नारायण महाराज निंभोरा यांचे दणदणीत विनोद सम्राट कीर्तन होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.





