
“त्या” नुकसानग्रस्त दुकानदारांना मनीयार बिरादरी तर्फे १ लाखाची आर्थिक मदत
जळगाव प्रतिनिधी ;_ धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील २१ दुकाने जाळून “त्या” दुकानदारांना उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित केल्याने ते पुनश्च आपला व्यवसाय करावा म्हणून जळगाव जिल्हा मनीयार बिरादरी तर्फे त्यांना १ लाख रुपयाचे सहकार्य – मदत करण्यात आले.
सदर रोख रक्कम पाळधी येथील नुकसानग्रस्त दुकानदारांना जळगाव जिल्हा मनीयार बीरादरीचे उपाध्यक्ष सय्यद चांद व जमियत उलमा चे मौलाना हाफिज रहीम पटेल व समस्त यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
एकता संघटन ही पाळधी येथील नुकसान ग्रस्त दुकानदारांसाठी जळगाव शहरातील काही मोजक्या दानशूर व्यक्तींकडे मदतीसाठी पोहोचणार असल्याने या नुकसानग्रस्त दुकानदारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन एकता संघटनेतर्फे मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती खालीद, मौलाना रहीम पटेल, फारुक शेख, नदीम मलिक, सय्यद चांद, मजहर पठाण, अंजुम रिझवी, अन्वर खान, मतीन पटेल, बाबा देशमुख, अमजद पठाण, अनिस शहा, उमर कासिम आदींनी केले आहे.