जळगांवराजकीयशासकीयसामाजिक

जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांसाठी प्रभारींची नियुक्ती; शिवसेनेत नवचैतन्य

जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांसाठी प्रभारींची नियुक्ती; शिवसेनेत नवचैतन्य

जळगाव (प्रतिनिधी): नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. उप मुख्यमंत्री व पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व १८ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी प्रभारी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, या घोषणेमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचा जल्लोष उसळला आहे.

शिवसेना मुख्यालयातून प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वरणगाव, भुसावळ, धरणगाव आणि नशिराबाद नगर परिषदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव आणि शेंदुर्णी (नगर पंचायत) या पाच ठिकाणांसाठी आ. किशोर अप्पा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर एरंडोल आणि पारोळा नगर परिषदेची जबाबदारी आ. अमोल पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. याचबरोबर, चोपडा, फैजपूर आणि यावल नगर परिषदांची धुरा आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या खांद्यावर, तर रावेर, सावदा आणि मुक्ताईनगर (नगर पंचायत) या ठिकाणांची जबाबदारी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. अमळनेर नगर परिषद प्रभारी म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी यांची निवड झाली आहे.

या सर्व महत्त्वाच्या नियुक्त्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, पक्षाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मजबूत संघटन आणि अचूक रणनीतीसह मैदानात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button