व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध गुन्हा ; परप्रांतीय तरुणींची सुटका
भुसावळ : – तालुक्यातून एका धक्कादायक घटना समोर आली असून कुऱ्हे पानाचे येथे एका हॉटेल मध्ये सरार्स वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला असून पोलिसांनी तीन परप्रांतीय तरुणींची सुटका करण्यात येऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणी हॉटेल मालक संभाजी एकनाथ पाटील (जामनेर) व व्यवस्थापक पंडीत टोंगळे (रा. कुऱ्हे पानाचे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुऱ्हेपानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंगवर पोलिसांनी रविवारी दुपारी अडीच वाजेच्या धाड टाकून कारवाईत हॉटेल मॅनेजर पंडीत टोंगळे रा. कुऱ्हे पानाचे व मालक संभाजी एकनाथ पाटील रा. जामनेर हे स्वतःच्या फायद्याकरीता पिडीत महिलांना हॉटेलमध्ये बोलवून पैशांचे प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास प्रवृत्त करीत होते. पोलिसांनी तिन्ही महिलांना विचारपुस करता त्यांनी सांगितले की, हॉटेलचे मैनेजर व चालक हे आम्हाला बोलावून घेऊन त्यांचकडे समागमासाठी येतात व ते चांगले पैसे देतात त्यांना मिळालेल्या पैशातून ते पैसे आम्हाला देतात. यानुसार . हॉटेल मॅनेजर पंडित टोंगळे ( ५६, कुऱ्हेपानाचे, ता. भुसावळ) व मालक संभाजी एकनाथ पाटील (45 रा.जामनेर) या दोघांविरुध्द स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सतिष कुलकर्णी, वाहतूक शाखेच्या सहाय्यक फौजदार रुपाली चव्हाण, हवालदार प्रदिप पाटील, अनिल झुंझारराव यांनी ही कारवाई केली.