गुन्हे

नीट परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या ; विरह सहन न झाल्याने पित्यानेही जगाला केले अलविदा !

नवी दिल्ली : चेन्नईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्याने एका मुलाने आपले जीवन अँपविल्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी पित्याने देखील टोकाचा निर्णय घेऊन जगाला अलविदा केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला

चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत नापास झाला. जगदिश्वरनने 2022 मध्ये 427 गुणांसह बारावी पास झाला. मात्र, जगदीश्‍वरनला दोन प्रयत्नांत नीट परीक्षेत नापास झाला. शनिवारी त्याने वडिलांच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरात त्याचा मृतदेह आढळला. मुलाच्या आत्महत्येमुळे वडील सेल्वसेकर याना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जगदिश्वरनचे वडील सेल्वसेकर मृतावस्थेत आढळले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांनी आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, स्वत:वर विश्वास ठेवा आणि आयुष्य जगा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दावा केला की, काही महिन्यांत NEET परीक्षा रद्द करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button