जळगाव : रेल्वेच्या धडकेत आधार बुधा पाटील (वय ६०, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरा दरम्यान रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरसोली येथे आधार बुधा पाटील हे वास्तव्यास असून ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ते शिरसोली ते दापोराकडील रेल्वेरुळाकडे गेले होते. धावत्या रेल्वेखाली येवून त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याहनंतर पंचनामा करुन
मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. त्यांच्या घटनेची माहिती कळताच त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.