
जळगाव l २५ ऑगस्ट २०२३ l भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक श्री उदय भालेराव यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी च्या फ्रेंड्स ऑफ बीजेपी चे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे.
फ्रेंड्स ऑफ बीजेपी चे महाराष्ट्र प्रदेश चे संयोजक श्री. सतीश जी निकम तसेच आय टी सेल चे प्रमुख श्री. आषिश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व विभागात फ्रेंड्स ऑफ बीजेपी च्या संयोजकांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी केल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात फ्रेंड्स ऑफ बीजेपी चे संयोजक नियुक्त करण्यात आले असून या सर्वांच्या सहयोगातून भारतीय जनता पार्टी चे थेट कार्यकर्ते नसलेल्या पण विचारधारा मान्य असलेल्या तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्यावर प्रेम करणा-या मंडळींना भाजपा शी जोडण्याचे काम फ्रेंड्स ऑफ बीजेपी च्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार आहे.
उदय भालेराव यांच्या या नियुक्ती बद्दल ग्राम विकास मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन,प्रदेश सरचिटणीस श्री विजय जी चौधरी तसेच विभागीय संघटन मंत्री श्री रवी जी अनासपुरे, जिल्हा अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर जळकेकर महाराज व अमोल भाऊ जावळे, महानगर जिल्हाध्यक्ष अध्यक्षा सौ उज्वला ताई बेंडाळे, खासदार श्री उन्मेष पाटील श्रीमती रक्षाताई खडसे आ सुरेश भोळे (राजु मामा) आ संजय सावकारे आ मंगेश दादा चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.