गुन्हेजळगांव

रिक्षा चालकाला धमकावून जातीवाचक शिवीगाळ, एकविरुद्ध गुन्हा

खान्देश टाइम्स न्यूज | २६ ऑगस्ट २०२३ । जळगावात एकाने भाडेतत्वावर दिलेल्या रिक्षाचे भाडे थकल्याने संबंधित चालकाला धमकावून त्याचे एटीएम कार्ड व इतर दस्तऐवज घेऊन बँक खात्यातील रक्कम काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी जातीवाचक शिवीगाळ केल्याने एकावर शहर पोलीस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात योगिता जितेंद्र ठाकूर (३४, रा. नवीन घरकूल, शिवाजीनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती दीपक ठाकूर यांना दीपककुमार गुप्ता (रा. शिवाजीनगर, हुडको) यांनी स्वतःच्या नावे घेतलेली रिक्षा भाडेतत्वावर चालविण्यासाठी दिली होती. रिक्षाचा अपघात झाल्यापासून पती यांचे रिक्षा चालविणे बंद होते. त्यामुळे रिक्षाच्या कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी गुप्ता यांनी दि.८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीला धमकावून एटीएम कार्ड व इतर दस्तएवज घेतले. तसेच त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली व रोख रक्कमही घेतली.

गुप्ता यांनी त्यानंतर देखील महिलेकडे पैशाचा तगादा लावून धमकावले. तसेच पतीला मारहाण करून महिला व तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करीत पैसे भरावेच लागतील, पैसे कसे वसूल करायचे ते मला चांगले माहित आहे, तुम्ही पैसे भरले नाही तर तुम्हाला परत जंगलात पाठवेल व तुमचे घर जप्त करेल, अशी धमकी देत दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून दिपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button