खान्देशगुन्हेजळगांव

५३ म्हशींची वाहतूक ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावः विनापरवाना वाहनांमध्ये निदर्यीपणे ५३ म्हशी कोंबून वाहतूक करणारे तीन वाहनांवर शनिवारी नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत म्हशी, वाहने असा एकूण ३६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवाहू वाहनांमधून अत्यंत निदर्थीपणे गुरांना कोंबून त्यांची वाहतुक होत असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नशिराबादमधून संशयास्परित्या जाणाऱ्या (एमएच १८ बीजी ९३१६), (एमएच १८ बीझेड २४४४) व (एमपी १३ जीबी ३६५४) क्रमांकाच्या वाहनांची तपासणी केली. यामध्ये पोलिसांना वाहनांमध्ये अत्यंत निदयपणे म्हशी कोंबलेल्या दिसून आल्या. तसेच म्हशींसाठी खाली कोणतेही गादी टाकलेली नव्हती (मॅटिंग) आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्याचे कोणतेही

प्रमाणपत्र आढळून आले नाही. दोन वाहनांमधून प्रत्येकी १८ ( किंमत १० लाख ८० हजार रुपये) व एका वाहनातून १७ (किंमत पाच लाख १० हजार रुपये) म्हशींची निर्दयीपणे वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी तीनही वाहने व म्हशी जप्त केल्या आहेत.

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोहेकॉ अतुल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायन खान कलीम खान (वय २८, रा. बलखड, जि. खरगोन, मध्यप्रदेश), साहीद खान सलीम खान (वय ३५, रा. बालासमट, जि. खरगोन, मध्यप्रदेश), समीर शहा सिद्धीक शहा (वय २९, रा. देवास, इंदूर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हरेष पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button