रेल्वे स्टेशन लगतची जुनी बांधकामे हटवली !
खान्देश टाईम्स न्यूज l जकी अहमद l जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळालगत छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या दिशेने ४-५ परिवार गेल्या ६०-७० वर्षापासून राहत होते. सध्या रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम सुरू असून त्यादृष्टीने गुरुवारी सकाळी मोठा फौजफाटा घेऊन पक्के अतिक्रमण हटविण्यात आले. नागरिकांच्या सोय सुविधांच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असून त्याठिकाणी नवीन व्यवस्था उभारली जाणार आहे.
एस.एस.इ. वर्क्सचे प्रमुख के.ओ.पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करण्यात आले असून पोतदार यांनी जळगावचा पदभार स्वीकारताच त्यांनी ही कार्यवाही केली आहे. बुलडोझर आणि जेसीबीच्या साहाय्याने ही कार्यवाही करण्यात आली असून आरपीएफ, जीआरपीफ, शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळून ही कार्यवाही केली आहे. भुसावळ विभागाचे विभागीय अभियंता डी.के.शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली.