सावदा येथे ईद मिलाद उत्साहात..
खान्देश टाईम्स न्यूज l मुखतार शेख l सावदा येथे ईदे मिलादुन्नबी सालाबादप्रमाणे यंदाही शांततेत पार पडली. सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सविस्तर वृत्त असे की, सावदा येथे ईदे मिलादुन्नबी निमित्त आयोजित कार्यक्रमात ईदे मिलादुन्नबी म्हणजे काय? मुस्लिम धर्माचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू मोहम्मद सल्लल्लाहु वलैई वसल्लम यांच्या जन्म दिन म्हणजे ईदे मिलादुन्नबी. त्यांनी संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश दिला होता. तसेच सर्वांनी मानवतेने शांततेत जगावे. कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता इस्लाम धर्म काय शिकवण देतो याची माहिती जगाला दिली म्हणून आज पावेतो संपूर्ण जगात ईदे मिलादुन्नबी मिरवणुक काढण्यात येते अशी माहिती मान्यवरांनी दिली.
मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालींदर पळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्व सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक यांनी मिरवणुक शांततेत आटोपून नमाज अदा केली. अनेक ठिकाणी नाश्ता, मिठाई, खिर, थंड मठ्ठा तसेच मोठ्या आखाडा येथे भंडारा आयोजित करण्यात आला होता तसेच रात्री देखील भंडाऱ्याचे आयोजन मोठ्या आखाडा येथे ठेवण्यात आले होते.