जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साजरी होत असलेल्या गांधी सप्ताहात दि. ०४ ऑक्टोबर रोजी भित्तीपत्रक स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या दोन्ही कार्याक्रमांचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडिया यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेला व भित्तीपत्रक स्पर्धेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या कार्य जीवनावर आधारीत सद्यस्थितीच्या परिस्थितीवर आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सादरीकरण केले.
तसेच भित्तीपत्रक (पोस्टर) स्पर्धेत सुद्धा विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर पोस्टरांच्या माध्यमातून विविध विषयांवरील गांधीजींच्या कार्याला उजाळा देत ते सर्वांसमोर मांडले. सदर स्पर्धेतील दोन्ही सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रकमेच्या स्वरुपात बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण हे कुलसचिव डॉ. विनोद पाटील व विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील हा प्रथम तर पूजा पाटील व निर्भय सोनार यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम क्रमांक नागेश्वर सपकाळ, द्वितीय क्रमांक प्राची इंगळे व तृतीय क्रमांक निशा नाईक यांनी पटकावला. डॉ. मनोज इंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. तुषार रायसिंग व डॉ. अतुल बारेकर आणि भित्तीपत्रक स्पर्धेसाठी डॉ. व्ही. एम. रोकडे व डॉ. संतोष खिराडे यांनी जबाबदारी सांभाळली. डॉ. विजय घोरपडे व डॉ. मनोज इंगोले हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.