खान्देश टाइम्स न्यूज | २५ जून २०२३ | जळगाव शहर उपविभागाचा पदभार घेताच उपविभागीय पोलीस अधिकारी ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. शहरातील हरीविठ्ठल नगरातील मारुती मंदिराजवळील परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी विभागाचे पथक आणि रामानंद पोलीस यांनी आज छापा टाकला. पथकाने एकूण ३२ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हरीविठ्ठल नगरातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या कीर्ती हार्डवेअरच्या बाजूला जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकासह रामानंद नगर पोलिसांच्या मदतीने रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजता जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १३ जणांवर कारवाई केली आहे. कारवाईत १० मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३२ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पो.कॉ. सचिन सुरेश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोहित श्रीराम बारी (वय-२८), दिलीप रामचंद्र कोळी (वय-४०), राजू राघव बारी (वय-५७), मोतीलाल महादू कुमावत (वय-७७), धर्मराज उर्फ गोपाल भागवत धनगर (वय-३४), विनोद शांताराम पाटील (वय-४२), धनराज दिलीप धनगर (वय-२८), भैय्या रामदास पाटील (वय-३९), गजानन देवराम बारी (वय-२८), प्रभाकर पुंडलिक बारी (वय-४९), ईश्वर दशरथ महाजन (वय-४६), बापू शामराव पाटील (वय-४०) आणि कैलास दत्तू महाजन (वय-४५) सर्व रा. हरी विठ्ठल नगर जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकात यांचा होता समावेश :
पथकात पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, राहुल पाटील, अशोक फुसे यांच्यासह रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोकॉ सागर देवरे यांनी कारवाई केली.