मुक्ताईनगर :-(प्रतिनिधी)
डोलारखेडा ग्रामपंचायती कडे वारंवार मागणी करूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्दानासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याने डोलारखेडा येथील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आणि तब्बल दोन तास रास्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उद्यान व्हावे ही मागणी डोलारखेडा येथील आंबेडकर प्रेमी जनतेने डोलारखेडा सुकळी ग्रुप ग्रामपंचायत कडे वारंवार केली होती सदर ग्रामपंचायतीकडे तीन जागा आहेत पैकी एक जागेवर धार्मिक प्रतिष्ठान उभे आहे तर दुसऱ्या जागेवर सभा मंडप चे बांधकाम सुरू आहे तिसऱ्या जागेवर गावातील एका इसमाने अतिक्रमण केले होते स्वतः अतिक्रमण निरस्त करून ती जागा उद्यानासाठी मिळावी ही मागणी समाजाची होती मात्र ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकास नोटीस बजावण्या पलीकडे दुसरे काही केलं नाही तसेच डॉक्टर आंबेडकर उद्यानासाठी जागा मिळावी या मागणीकडे गांभीर्याने बघितले नाही याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जळगाव प्रांत अधिकारी भुसावळ यांना निवेदन दिले अतिक्रमण निरस्त करावे तसेच डॉक्टर आंबेडकर उद्यानासाठी जागा मिळाली नाही तर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता .
आज सकाळी आठ वाजेपासून आंबेडकरी जनता रस्त्यावर जमायला सुरुवात झाली होती त्यानंतर रस्ता रोको करत मुक्ताईनगर आणि मध्य प्रदेश कडून येणारी आणि कुऱ्हा काकोडाकडून येणारी वाहतूक अडवण्यात आली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते गटविकास अधिकारी श्रीमती निशा जाधव हे घटनास्थळी दाखल झाले.
* आठ दिवसात प्रश्न मार्गी लावणार बी. डि.ओ.निशा जाधव*
दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावणार असल्याचे लेखी पत्र गट विकास अधिकारी श्रीमती निशा जाधव यांनी उपस्थित आंदोलन कर्ता जनतेला दिले.
* उद्यान सोबत संविधान सभागृहासाठी सुद्धा निधी देतो आमदार चंद्रकांत पाटील . *
डोलारखेडा येथील आंबेडकरी समूहाची मागणी रास्त आहे हा प्रश्न तातडीने सोडवला जाणार आहे सोबतच या गावी संविधान सभागृह बांधण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
# अन्यथा पूरनाड फाट्यावर रास्ता रोको भाई जगन सोनवणे . #
प्रशासनाने आठ दिवसात उद्यानाचा प्रश्न सोडवण्याचे लेखी पत्र दिले आहे त्यामुळे आम्ही सदर आंदोलन मागे घेत आहोत मात्र दिलेल्या वेळेत जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही पूरनाड फाटावर रास्ता रोको करू असा इशारा भाई जगन सोनवणे यांनी यावेळी दिला.
यावेळी राकेश बग्गन शिवाजी वानखेडे संघपाल थाटे विकास वानखेडे रोशन इंगळे सचिन सुरवाडे दुर्योधन सुरवाडे शिवाजी इंगळे योगेश जाधव रतन जाधव विकास जाधव सुमेध इंगळे सिद्धार्थ इंगळे निखिल इंगळे प्रशिक इंगळे सचिन तायडे पंकज शिरतुरे अंकुश सुरवाडे जीवन इंगळे निलेश इंगळे प्रशांत इंगळे मीना सूर्यवंशी मनोज तायडे सारंग आटकळे शुभम वानखेडे राजेंद्र इंगळे राष्ट्रपाल इंगळे गौरव सुरवाडे अंकुश सुरवाडे तेजस निकम शत्रुघन वानखेडे जितेंद्र सुरवाडे दिलीप इंगळे शंकर इंगळे भीमराव जाधव मिलिंद जाधव संदीप बोदडे दीपक इंगळे अजय इंगळे सिद्धार्थ इंगळे राहुल इंगळे शुभम जाधव बाबुराव थाटे बाळू इंगळे सिद्धार्थ साठे वंदना जाधव छाया सुरवाडे बेबी वानखेडे लता इंगळे उमा सुरवाडे गंगु थाटे संगीता तायडे यशोदा वानखेडे पद्ममणी थाटे विद्या जाधव देवकी इंगळे प्रमिला इंगळे गणेश तायडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.