जळगाव : – प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी १/- रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता.
यावर्षी खरीप हंगामात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या निकषानुसार ज्या महसूल मंडळांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग,सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊन आर्थिक नुकसान झाले होते.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यातील २७ महसूल मंडळांमध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई या निकषानुसार 1,43,317 शेतकऱ्यांना रू.76 कोटी 40 लाख 04 हजार 607 एवढी नुकसान भरपाई मंजुर झाली असून सदरील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली.
तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा टप्पा 2) ज्याची अमलबजावणी जानेवारी 2024 पासून प्रस्तावित आहे. या मध्ये जळगाव जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावांचा समावेश करण्याची मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ना. अजित दादा पवार साहेब व कृषि मंत्री ना. धनजय मुंडे साहेब यांच्या कडे केली असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली.
तालुकानिहाय शेतकरी संख्या व मंजुर नुकसान भरपाई…
अमळनेर 49,783 शेतकरी : रूपये 36 कोटी 14 लाख 17 हजार 282
भडगाव 18,174 शेतकरी : रुपये 8 कोटी 08 लाख 88 हजार 343
चाळीसगाव 56,951 शेतकरी : रुपये 24 कोटी 34 लाख 76 हजार 210
धरणगाव 11,102 शेतकरी : रुपये 5 कोटी 49 लाख 03 हजार 68
मुक्ताईनगर 565 शेतकरी : रुपये 20 लाख 31 हजार 989
रावेर 2191 शेतकरी : रुपये 88 लाख 04 हजर 563
यावल 4551 शेतकरी : रूपये 1 कोटी 24 लाख 83 हजार 151
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजने च्या माध्यमातून हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या घटकानुसार जळगाव जिल्ह्यातील कापूस,उडीद, मूग,सोयाबीन,मका,ज्वारी इ. उत्पादक 1,43,317 शेतकऱ्यांना रुपये 76 कोटी 40 लाख 04 हजार 607 एवढी 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजुर झालेली असून हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे काढणी पश्चात झालेले नुकसान, जास्त च्या पावसामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना देखील तात्काळ क्लेम सेटेल करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार आहे