क्रीडा
खास जळगाववासियांसाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना लाईव्ह स्क्रिनवर
जळगाव l १८ नोव्हेंबर २०२३ l युवाशक्ती फाउंडेशन तर्फे क्रिकेट विश्वचषकातील रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना १०x२० फूट अश्या भल्या मोठ्या एल.ई.डी. स्क्रीन वर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था खान्देश सेंट्रल मॉल येथील मैदानात करण्यात आली आहे. या ठिकाणी मनमोहक आतिषबाजी, पंजाबी ढोल, सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यवस्था, बसण्याची विशेष व्यवस्था, तिरंगे ध्वज, सेल्फीने पॉईंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
सदर आयोजन निशुल्क असून सर्व जळगावकर नागरिकांसाठी दुपारी १२.३० ते सामना संपेपर्यंत खुले राहणार आहे.
जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी केले आहे.