खान्देशगुन्हेजळगांव

एलसीबीच्या पथकाने शिव महापुराण कथास्थळी चोरी करणाऱ्या १० जणांच्या टोळीला केली अटक

जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे सुरु असलेल्या श्री. शिवमहापुराण कथेतून पहिल्याच दिवशी मंगपोत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता. आज पुन्हा एलसीबीच्या पथकाने १० जणांची टोळीला अटक केली आहे. ही टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ तीन दिवसांपासून श्री. शिवमहापुराण कथा सुरु आहे. कथेला दररोज लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोनपोत लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने कथेच्या पहिल्याच दिवशी संशयितरित्या फिरणाऱ्यातब्बल २७महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, गुरुवारी पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थान

व मध्यप्रदेशातील दहा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली असून या आता एकूण संशयितांची संख्या ही ३७ इतकी झाली आहे. दरम्यान, राज्यात इतरत्रही असे भव्य कार्यक्रम झाले असून यात या चोरट्यांचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

टोळीत मध्यप्रदेश, राजस्थान येथील संशयितांचा समावेश कथेच्या पहिल्याची दिवशी पकडलेल्या २७ जणांच्या टोळी ही मध्यप्रदेशातील धडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, धडेली चारभुजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील होती. दरम्यान, गुरुवारी पुन्हा एलसीबीच्या पथकाने १० महिलांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील पाच महिला या राजस्थानमधील अलवर, भरतपुर, सदनपुरी याठिकाणारील तर पाच संशयित महिला या इंदौर येथील असून त्या देखील एकमेकांच्या नातलग असून एक संशयीत इलाहाबाद येथील असल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.

एलसीबीच्या पथकाने पकडलेल्या टोळीमध्ये मिथीलेश बदनसिंगकुमार (वय २८), बिमलेश अनिलकुमार (वय ३५), प्रिया उर्फ ज्योती दीपक साहिल (वय ३०), ममताकुमारी सुभेदारसिंग (वय ३५), बिनाकुमारी जंदेलकुमार (वय ५०, सर्व रा. राजस्थान), किरण रमेश हरजन (वय २३, रा. ईलाहबाद, ता. उत्तरप्रदेश), विजेता राकेश जाटम (वय ३०), उषा सुरज जाटम (वय ४०), सविता बिनकुमार (वय २१), कोमल विजेंदर जाटम (वय २०), कमलेश राजेंद्र जाटम (वय ३५, सर्व रा. इंदौर, मध्यप्रदेश) या संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ९ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button