बरेली: – बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका भीषण अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात टायर फुटल्याने उत्तराखंडहून आलेल्या डंपरची धडक बसल्याने हा अपघात झाला. एका लग्नाला उपस्थित राहून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रली लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकने धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला आणि कार महामार्गाच्या विरुद्ध बाजूला पलटी झाली. उत्तराखंडमधून रेती घेऊन आलेल्या या ट्रकने कारला काही अंतर फरपटत नेलं. ही कार मारुती सुझुकी एर्टिगा असल्याचं सांगण्यात येत आहे.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे, असे बरेलीचे एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले..
मृतांची नावे पुढीलप्रमाणे मोहम्मद इरफान ,मोहम्मद अरिफ, शादाब ,असीम अली , अलीम अली, मोहम्मद अय्युब,मुन्ने अली आणि आसिफ