जळगावः;- जिल्हयात अवैध दारु हातभट्टी चालकांवर मोठया प्रमाणात कारवाई केली जात आहे दहा जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठवून कारवाई केली तर दुसरीकडे : बोगस ताडीचा देखील सुळसुळाट झाला असून खरोखर ताडीच्या झाडांची संख्या आहे का? हे रहस्य फक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांना माहिती असल्याने बोगस ताडीच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांची कोटीच्या घरात उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.
त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रमुख पदावर जिल्हयातील रहिवाशी असलेले स्थानिक अधिकारी असल्यामुळे परप्रातींय बोगस ताडीलाभले असल्याचे बोलले जात आहे. अवैध दारु विक्रेत्यांप्रमाणे बोगस ताडी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखविणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्हयात हातभट्टी दारु विक्रेते हे खेड्या पाड्यात झोपडीत राहणारा वर्ग आहे त्यांची परिस्थीती ही जेमतेम असते त्यांच्यावर कारवाई करणे सोपे आहे कारण ते आर्थिक मजबुत नसतात परंतू अवैध दारु विक्रत्यांचे समर्थन अजिबात नाही मंग जिल्हयात बोगस ताडी विक्रेत्यांवर राज्य उत्पादन विभाग कारवाई का करत नाही. एखादीउत्पादनाची कारवाई दिसली नाही कारण ताडी व्यवसायात आंध्रप्रदेश व तेलांगणातील काही कोट्याधीश मंडळी जिल्हयात सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे ताडीचे झाडे किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे मंग त्या संबधितांना लायन्सन कुठल्या आधारावर दिले गेले आहे तसेच राज्य उत्पादन विभागाने कधी ताडीची तपासणी केली आहे का? जिल्हयात अनेक भागांमध्ये मानवी शरीराला घातक अश्या रसायन मिश्रीत पदार्थ पासून बनावट ताडी तयार केली जात असते त्यामुळे काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक लोभापायीनागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.