जळगाव ;- शसिथी फॉलनी परिसरात असलेल्या खुसो निवासला लागून असलेल्या दुकानात व शॉपिंग कॉम्पलेक्समधील खुशी किराणा दुकान येथे १२ रोजी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अडीच लाखांचा गुटखा जप्त केल्याची आकारवाई केली असून तिघानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नेठानंद चेतवणी, दिपक रमेश चेतवाणी, सिमरण रमेश चेतवणी, सर्व रा. 98. खुशी निवास, सिंधी कॉलनी, जळगाव असे आरोपींचे नावे आहेत.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंयाखु पान मसाल्याची विक्री करीत असल्याबायतची माहिती पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना मिळाली होती. या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे एकूण २ लाख ४४ हजारांचा राज निवास, प्रिमीयम राजश्री पान मसाला, करमचंद प्रिमीयम पान मसाला, पान पराग एक्सट्रा पान मसाला, डी बी सिग्नेचर फिटनेस पान मसाला प्रिमीयम 21-01 जाफरानी जर्दा इत्यादी असा प्रतिबंधीत तंबाखू पान मसाला मिळून आला होता,
या बावतीत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी रमेश जेठानंद चेतवणी, दिपक रमेश चेतवाणी यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षकएम राजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ रंगनाथ धारबळे, पोलीस अधिक्षक, कार्यालय, सपोनि सिदधेश्वर आखेगावकर, पोहेकों प्रविण प्रलाद पाटील, पोहेकॉ जमील अहमद हमीद खान, सचिन सुभाष विसपुते, पोना भुषण विनायक मांडोळे, पोको आसीफ शौकत पिंजारी, पोलिस कॉन्स्टेबल भरत पांडूरंग डोके, पोलीस मुख्यालयातील भारती भोई, सुरेखा पाटील, प्रतिभा पांडूरंग खैरे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोउनि दत्तात्रय पांटे, पोउनि रविंद्र मानसिंग गिरासे, मपोउपनिरी रूपाली सुरेश महाजन, पोहेकॉ किरण पाटील यांनी केली असून पोकों किरण पाटील एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांनी फिर्याद दाख्ला केली आहे. दरम्यान दिपक चेतवाणी याचेवर यापूर्वी अश्याच प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहे.