जळगाव;- विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टवर तालुका पोलीसांनी कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील डिकसाई येथील गावाजवळील रोडवरून तापी नदी पात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी करवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शुक्रवारी २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत डिकसाई गावाजवळील रोडवर ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीयू ८२६५) हे वाळू घेवून जात असतांना पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रक्टर जप्त केले. याप्रकरणी शनिवारी २७ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता पोलीस कॉस्टेबल अभिषेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम सुर्यकांत पाटील (वय-२१) आणि पुरूषोत्तम हिरामण कोळी (वय-२६) दोन्ही रा. डिकसाई ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.